आता उचकी कशी काढायची? उषा मंगेशकरांनी सांगितला 'मला लागली कुणाची उचकी' गातानाचा अनुभव; म्हणाल्या-

Usha Mangeshkar Reveals Recording Experience Behind Mala Lagli Kunachi Uchaki: गायिका उषा मंगेशकर यांच्या अजरामर गाण्यातील एक गाणं म्हणजे 'मला लागली कुणाची उचकी'. यात खोटी उचकी काढणं किती अवघड झालं होतं हे उषा मंगेशकर यांनी मुलाखतीत सांगितलंय.
usha mangeshkar on mala lagli kunachi uchki

usha mangeshkar on mala lagli kunachi uchki

esakal

Updated on: 

मंगेशकर घराण्यातील रत्नांपैकी एक रत्न म्हणजे उषा मंगेशकर. मराठी हिंदी अशा अनेक भाषेत त्यांनी गाणी गायली. त्यांचा शास्त्रीय संगीताचा अभ्यास तगडा होता. मात्र तितकीच त्यांची वेगवेगळ्या चालीतली गाणीही प्रेक्षकांच्या भेटीला आली. उषा यांच्या आवाजाने अनेक लावण्या अजरामर केल्या. १९७२ साली प्रदर्शित झालेल्या 'पिंजरा' या चित्रपटातील बहुतेक गाणी त्यांनी गायली. त्यातलंच एक अजरामर झालेलं गाणं म्हणजे 'मला लागली कुणाची उचकी'. या गाण्याला एक खास खट्याळ, मिश्कील आणि उचकी लागल्यासारखा लहेजा आवश्यक होता. मात्र, रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये हा विशिष्ट ताल आणि नैसर्गिक विनोदी अंदाज साधणं वाटतं तितकं सोपं नव्हतं. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत उषा यांनी तेव्हा काय घडलेलं याबद्दल सांगितलय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com