

usha nadkarni
esakal
आज अनेक मुली आईच्या घरी असताना स्वयंपाक करत नाहीत. करिअरसाठी मेहनत करत असलेल्या मुलींना स्वयंपाकासाठी वेळ तसा कमीच मिळतो. त्यामुळे लग्नानंतर मात्र त्यांना नवनवीन गोष्टींचा अनुभव येत असतो. असाच अनुभव लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनाही आला. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या सासरच्या घरी पहिल्यांदा बनवलेल्या चिकनचा किस्सा सांगितला आहे. त्यांच्या माहेरी त्यांनी कधीही स्वयंपाक केला नव्हता. शिवाय त्यांच्या घरी चिकन मटण फार कमी बनवलं जात होतं. मात्र सासरी आल्यावर त्यांना हे सगळं बनवायला लागलं. तेव्हा त्यांची अवस्था बिकट झाली होती. त्या सासरी जाऊनच जेवण बनवायला शिकल्या असं त्या मुलाखतीत म्हणाल्या.