

Uttar Movie Song Out
esakal
Marathi Entertainment News : जगातील सर्वात सुरक्षित,निखळ, नि:स्वार्थ आणि कधीही न तुटणारे नाते म्हणजे ‘आई’. तिच्या उपस्थितीत मुलाला मिळणारा आधार, तिच्या डोळ्यात दिसणारी काळजी आणि तिच्या मिठीत सामावलेली शक्ती यांची तुलनाच होऊ शकत नाही. मुलाच्या पहिल्या रडण्यापासून ते जीवनातील प्रत्येक वळणापर्यंत आई सावलीसारखी त्याच्यासोबत उभी असते. ‘उत्तर’ या चित्रपटात हे असेच नाते अतिशय संवेदनशीलपणे, वास्तववादी आणि हृदयस्पर्शी पद्धतीने मांडण्यात आले आहे. या नात्याच्या भावविश्वाला अधिक गहिरे करणारे नवीन गाणे ‘असेन मी’ प्रेक्षकांच्या भेटीला आले असून, आईच्या नि:स्वार्थ प्रेमाची सुंदर व्याख्या या गाण्यातून अनुभवायला मिळते.