Valentine Day: घरी बसून साजरा करणार ‘व्हॅलेंटाईन डे’? पार्टनरसोबत पाहा ओटीटीवरील 'हे' चित्रपट आणि वेब सीरिज

Valentine Day : . जर तुम्हाला ‘व्हॅलेंटाईन डे’ तुमच्या पार्टनरसोबत घरी बसून साजरा करायचा असेल तर तुम्ही ओटीटीवर काही रोमँटिक चित्रपट आणि वेब सीरिज पाहू शकता.
Valentine Day
Valentine Day Sakal
Updated on

Valentine Day : आजचा दिवस अनेकांसाठी खास आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’ (Valentine Day) हा दिवस प्रेम व्यक्त करण्याचा दिवस आहे. कोणी गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडला गुलाब किंवा रिंग देऊन प्रपोज करतात, तर कोणी पत्नी किंवा नवऱ्यासाठी कॅन्डल लाईट डिनरचा बेत करतं. जर तुम्हाला हा खास दिवस तुमच्या पार्टनरसोबत घरी बसून साजरा करायचा असेल तर तुम्ही ओटीटीवर काही रोमँटिक चित्रपट आणि वेब सीरिज पाहू शकता.

Little Things (लिटिल थिंग्स)

'लिटिल थिंग्स' ही एक रोमँटिक -कॉमेडी वेब सीरिज आहे, ज्यामध्ये एका जोडप्याची कथा दाखवण्यात आली आहे. सीरिजमध्ये ध्रुव सहगल आणि मिथिला पालकर यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.या सीरिजमधील दोघांचे प्रेमळ बाँडिंग प्रेक्षकांना खूप आवडले. ही सीरिज तुम्ही नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.

Permanent Roommates (परमानेंट रूममेट्स)

परमानेंट रूममेट्स या वेब सीरिजमध्ये सुमित व्यास आणि निधी सिंह यांनी काम केलं आहे. या वेब सीरिजमध्ये एकत्र राहणाऱ्या कपलची गोष्ट दाखवण्यात आली आहे. ही वेब सीरिज तुम्ही प्राइम व्हिडीओवर पाहू शकता.

Mismatched (मिसमॅच)

मिसमॅच या शोमध्ये तुम्हाला कॉलेजमधील एका जोडप्याची प्रेमकथा पाहायला मिळणार आहे. हा शो 2020 मध्ये रिलीज झाला होता. प्राजक्ता कोहली आणि रोहित सराफ यांनी या वेब सीरिजमध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. ही वेब सीरिज तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.

Valentine Day
Valentine Day 2024 : जोडीदाराला ‘हे’ खास गिफ्ट्स देऊन, साजरा करा ‘व्हॅलेंटाईन्स डे’

रॉकी और रानी की प्रेम कहानी (Rocky Aur Rani Kii Prem Kahaani)

रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटात दोन वेगवेगळ्या बॅकग्राऊंडमधून आलेल्या जोडप्याची भन्नाट प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात अनेत ट्विस्ट येतात ज्यामुळे तुम्ही खळखळून हसाल आणि चित्रपटातील काही सीन्स पाहून तुम्ही भावूकही व्हाल. हा चित्रपट तुम्ही प्राइम व्हिडीओवर पाहू शकता.

जब वी मेट (Jab We Met)

जब वी मेट हा चित्रपट अनेकांचा ऑलटाइम फेवरेट रोमँटिक चित्रपट आहे. या चित्रपटातील गीत आणि आदित्यच्या प्रेमकथेला प्रेक्षकांची पसंती मिळाली. हा चित्रपट तुम्ही प्राइम व्हिडीओवर पाहू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com