Premier
जब्राट सिनेमासाठी वनिता बनली रॅपर; सोशल मीडियावर नवीन लुक चर्चेत
Vanita Kharat New Movie: अभिनेत्री वनिता खरात नव्या अंदाजात नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. जाणून घेऊया तिच्या नव्या सिनेमाविषयी.
Marathi Entertainment News : प्रसिद्ध चतुरस्त्र अभिनेत्री वनिता खरातचा मोठा चाहता वर्ग आहे. वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिकांनी प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या वनिताचा ‘रॅपर लूक’ नुकताच समोर आला आहे. तिचा हा रॅपर स्वॅग आगामी ‘जब्राट’ या मराठी चित्रपटातील आहे. येत्या २० फेब्रुवारीला तारा करमणूक निर्मित प्रगती कोळगे दिग्दर्शित ‘जब्राट’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

