‘वाराणसी’मुळे सिनेविश्वात उत्सुकतेची लाट; राजामौली, महेश बाबू आणि प्रियंका चोप्रा यांचा खास खुलासा

Priyanka Chopra On Her Upcoming Movie Varanasi : वाराणसी हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या निमित्ताने या सिनेमातील कलाकारांनी सिनेमाविषयी महत्त्वपूर्ण खुलासा केला.
Priyanka Chopra On Her Upcoming Movie Varanasi

Priyanka Chopra On Her Upcoming Movie Varanasi

esakal 

Updated on

Entertainment News : एस. एस. राजामौली हे भारतीय चित्रपटसृष्टीतील मोजक्या दिग्दर्शकांपैकी एक असून त्यांनी ब्लॉकबस्टरची व्याख्याच बदलून टाकली आहे. भव्य कॅनव्हास, प्रभावी दृष्टीकोन आणि लक्षात राहणाऱ्या कथा यासाठी ओळखले जाणारे राजामौली आता आपल्या आगामी मेगा अ‍ॅक्शन-अ‍ॅडव्हेंचर चित्रपट ‘वाराणसी’ सह प्रेक्षकांसमोर येत आहेत. महेश बाबू, प्रियंका चोप्रा जोनस आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट आधीपासूनच देशातील सर्वाधिक चर्चेत आणि बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक ठरला आहे. आध्यात्मिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या वाराणसीच्या पार्श्वभूमीवर आधारित हा चित्रपट पारंपरिक मुळे आणि आधुनिक, प्रेक्षकांना जवळची वाटणारी कथा यांचा सुंदर संगम घडवणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com