Shiva Serial : 'शिवा' मालिकेत वर्षा उसगांवकर आणि मेघना एरंडे यांची एन्ट्री दाखवण्यात आली आहे. सीताईच्या मैत्रिणी म्हणून आलेल्या दोघी जुण्या आठवणीत रमल्या आहेत.
झी मराठीवरील 'शिवा' मालिका सध्या प्रेक्षकांच्या घराघरात पोहचली आहे. मालिकेतील सर्व पात्र प्रेक्षकांच्या घरातील सदस्यासारखे बनले आहेत. दरम्यान नुकताच मालिकेचा एक प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये वर्षा उसगांवकर आणि मेघना एरंडेची एन्ट्री दाखवली आहे.