Viral Video : लेकीला कुशीत घेतलेल्या वरुणचा फोटो व्हायरल ; नताशा-वरुणवर शुभेच्छांचा वर्षाव

Varun Dhawan take her daughter home : अभिनेता वरुण धवनचा त्याच्या लेकीला हॉस्पिटलमधून घरी घेऊन जातानाचा व्हिडीओ व्हायरल झालाय.
Varun Dhawan
Varun Dhawan Esakal

Varun Dhawan : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन काही दिवसांपूर्वीच बाबा झाला. ३ जून २०२४ ला वरुणची पत्नी नताशाने एका गोड मुलीला जन्म दिला. वरुणचे वडील आणि दिग्दर्शक डेव्हिड धवन यांनी ही बातमी पहिल्यांदा जाहीर केली. नुकताच वरुणचा नवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

सोशल मीडियावर लेकीबरोबरच व्हिडीओ व्हायरल

आता ३ दिवसांनी नताशाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला असून सोशल मीडियावर वरुण त्याच्या लेकीला आणि बायको नताशाला घरी घेऊन जातानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये वरुणने त्याच्या लेकीला कुशीत घेतलं असून तो आणि त्याची बायको कारजवळ जाताना दिसतोय.

धवन कुटूंब आज त्यांच्या नातीचं स्वागत करणार आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झालाय.

नेटकऱ्यांनी केलं अभिनंदन

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी कमेंट्स करत वरुण आणि त्याच्या पत्नीचं अभिनंदन केलं. अनेकांनी बाळालाही शुभार्शिवाद दिले आणि उत्तम भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Varun Dhawan
Varun Dhawan: वरुण धवनच्या बर्थ-डेनिमित्त चाहत्यांना सरप्राइज; 'बेबी जॉन'चं हटके पोस्टर आऊट

सोशल मीडियावर एक सुंदर व्हिडीओ शेअर करत वरुणने लेकीच्या जन्माची बातमी शेअर केली.लेकीच्या आगमनानंतर इन्स्टाग्रामवर ग्राफिक व्हिडीओ शेअर करत वरुणने कॅप्शन दिलं होतं कि, “आम्हाला मुलगी झाली आहे. आई आणि बाळासाठी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद. हरे राम हरे राम, राम राम हरे हरे । हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ।”

वरुणने गुड न्यूज दिल्यानंतर बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी त्याला शुभेच्छा दिल्या. अर्जुन कपूर, करण जोहर, सिद्धार्थ मल्होत्रा, आलिया भट, कियारा अडवाणी अशा अनेक कलाकारांनी खास पोस्ट शेअर करत वरुण-नताशाचं अभिनंदन केलं. तर करणने पोस्टमध्ये त्याने वरुणला मुलगी व्हावी अशी इच्छा खूप आधी व्यक्त केली होती असा खुलासा केला होता.

वरुणची कारकीर्द

वरुणचा आगामी 'बेबी जॉन' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे याशिवाय 'स्त्री २' या सिनेमातूनही वरुण प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. याशिवाय 'व्हिडी १८' आणि 'हम्प्टी शर्मा कि दुल्हनिया' या फिल्म सीरिजच्या आगामी भागातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.

Varun Dhawan
Varun Dhawan : वरुण धवन झाला बाबा; पत्नी नताशानं दिला मुलीला जन्म

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com