'अरे जरा पटेल असे तर दाखवा' 'वीण दोघातली ही तुटेना' मालिकेत स्वानंदीला सर्पदंश! नेटकरी म्हणाले; 'असला फालतूपणा...'

VEEN DOGHANTALI HI TUTENA SWANANDI SNAKE BITE:‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये नागपंचमीच्या कार्यक्रमात स्वानंदीला सर्पदंश झाल्याचं पाहायला मिळत आहे. मालिकेचा प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी ट्रोल केलय.
VEEN DOGHANTALI HI TUTENA

VEEN DOGHANTALI HI TUTENA

esakal

Updated on

VEEN DOGHANTALI HI TUTENA LATEST PROMO: वीण दोघांतली ही तुटेना मालिकेत सध्या नवनवे ट्वीस्ट येताना पहायला मिळताय. मालिकेत मागच्या भागात समर स्वानंदीला खास सप्राइज देतो. तिच्यासाठी खास घरातच डिनर डेट अरेंज करतो. यावेळी तो स्वत:च्या हाताने जेवण बनवतो. त्यानंतर समर तिला एक सुंदर ड्रेस देतो आणि डेटसाठी तयार होण्यासाठी सांगतो. परंतु दोघांतील वाढतं प्रेम पाहून मल्लिका आणि अंशुमन यांना प्रचंड राग येतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com