Veen Doghatli Hi Tutena new promo
esakal
VEEN DOGHATLI HI TUTENA SERIAL PROMO: झी मराठीवरील वीण दोघांतली ही तुटेना ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. मालिकेतील पात्र प्रेक्षकांच्या घरातील भाग झाले आहे. दरम्यान अशातच मालिकेत वेगवेगळे ट्वीस्ट येताना पहायला मिळताय. एकमेकांच्या मर्जीशिवाय लग्न केलेले समर-स्वानंदी आता एकमेकांशिवाय राहू शकत नाहीय. दोघेही एकमेकांच्या प्रेमात बुडाले आहे. दरम्यान अशातच आता स्वानंदी समरला आनंदीची बातमी देण्याची शक्यता आहे.