स्वानंदीसाठी समर करणार वडाची पूजा, तर स्वानंदीही देणार प्रेमाची कबुली! 'वीण दोघातली...' मध्ये अखेर तो क्षण येणार

VEEN DOGHATLI HI TUTENA UPCOMING EPISODE PROMO: समर आणि स्वानंदी यांच्या नात्यात आता एक नवा टप्पा येणार आहे. समर स्वानंदीला फिरायला एका मोकळ्या माळ रानावर फिरायला घेऊन जाणार आहे.
vin doghatli hi tutena

vin doghatli hi tutena

ESAKAL

Updated on

पावसाळ्याच्या आगमनासोबत महाराष्ट्रात सण-उत्सवांची चाहूल लागते. या सणांपैकी सर्वप्रथम येणारा महत्त्वाचा सण म्हणजे वटपौर्णिमा . या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि सुखी संसारासाठी वडाच्या झाडाची पूजा करून व्रत करतात. महाराष्ट्राच्या संस्कृतीत या सणाला विशेष महत्त्व आहे. आपल्या आवडत्या मालिकांमधील आवडती पात्रेही हा सण खास पद्धतीने साजरा करताना दिसणार आहेत. 'वीण दोघातली ही तुटेना' मालिकेत समर आणि स्वानंदी यांची वटपौर्णिमा कशी साजरी करणार यासाठी मालिकेचे येणार भाग पाहावे लागणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com