
Bollywood Entertainment News : बॉलिवूडमधील सगळ्यात मोठं आणि प्रसिद्ध घराणं म्हणजे कपूर कुटूंब. पृथ्वीराज कपूर यांच्यापासून सुरु झालेला या घराण्याचा प्रवास आज रणबीर कपूरपर्यंत अविरत सुरु आहे. यातीलच एक चर्चेत राहिलेलं व्यक्तिमत्त्व म्हणजे शम्मी कपूर. बिनधास्त स्वभावाची प्रसिद्ध असलेल्या शम्मी कपूर यांचे अजूनही अनेक चाहते आहेत. बॉलिवूडमधील ग्लॅमरस भूमिकांप्रमाणेच शम्मी यांचं वैयक्तिक आयुष्यही तितकंच लाईमलाईटमध्ये राहिलं.