'अरे मनमोहना...' फेम आशा काळे आठवतात का? अनेक वर्षांनी आल्या कॅमेरासमोर; अभिनेत्रीला पाहून नेटकरी भारावले

ASHA KALE COMEBACK ON CAMERA: मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आशा काळे अनेक वर्षांनी प्रेक्षकांसमोर आल्या. त्यांना पाहून नेटकरीही जुन्या आठवणींमध्ये रमले.
ASHA KALE

ASHA KALE LATEST PHOTO

ESAKAL

Updated on

Entertainment News: मराठी सिनेसृष्टीने प्रेक्षकांना असे काही हिरे दिले ज्यांची जागा इतर कोणताही कलाकार घेऊ शकत नाही. लक्ष्मीकांत बेर्डे, दादा कोंडके यांच्यासोबतच अनेक मराठी अभिनेत्रींनीही आपल्या अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी जागा निर्माण केली. त्यातल्याच एक ज्येष्ठ अभिनेत्री म्हणजे आशा काळे. 'हा खेळ सावल्यांचा', 'अष्टविनायक', 'सासुरवाशीण', 'संसार', 'तांबडी माती' यांसारख्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या आशा काळे यांनी एक काळ गाजवला. त्यांचा 'बाळा गाऊ कशी अंगाई' हा चित्रपट तर गावागावात गाजला. त्यातील गाणीही प्रचंड लोकप्रिय झाली. त्यातील 'निंबोणीच्या झाडामागे' हे गाणं तर आजही मराठी प्रेक्षकांच्या ओठी असतं. मात्र आता आशा काळे कशा दिसतात हे तुम्ही पाहिलंत का?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com