ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. चंद्रकांत लिमये यांचं निधन; कौटुंबिक सहलीदरम्यान घेतला अखेरचा श्वास

Pandit Chandrakant Limaye Demise : ज्येष्ठ शास्त्रीय गायक आणि अभिनेते पंडित चंद्रकांत लिमये यांचं आकस्मिक निधन झालं. आसामला सहलीला गेले असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. चंद्रकांत लिमये यांचं निधन; कौटुंबिक सहलीदरम्यान घेतला अखेरचा श्वास
Updated on

Marathi News : मराठी संगीत रंगभूमीवरील कट्यार काळजात घुसली या नाटकात पंडित वसंतराव देशपांडे यांच्यानंतर खाँसाहेब आफताब हुसेन ही भूमिका साकारणारे, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात चंद्रमोहिनी, जयध्वनी या रंगांची निर्मिती करणारे ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. चंद्रकांत लिमये यांचे रविवारी संध्याकाळी निधन झाले. ते मृत्यूसमयी 76 वर्षांचे होते. वसंतरावांची गायकी समर्थपणे पुढे चालवणारा सूर्य हरपल्याची भावना अनेक संगीतप्रेमींनी व्यक्त केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com