Zeenat Aman Controversy : "प्रेमप्रकरण फक्त काही माझ्याच घरात सुरू नव्हती", वडील आणि झीनत अमान यांच्या अफेअरविषयी सांगताना 'मैं हूँ ना' फेम अभिनेत्याने केली इंडस्ट्रीची पोलखोल

Zeenat Aman & Sanjay Khan Affair Controversy : अभिनेत्री झीनत अमान आणि अभिनेते संजयखान यांच्या प्रेमप्रकारणाबाबत संजय यांचा मुलगा झाएद खानने पहिल्यांदाच भाष्य केलं.
Zayed Khan
Zayed Khan Esakal
Updated on

Zayed Khan : 'में हूँ ना' या शाहरुखच्या गाजलेल्या सिनेमातून अभिनेता झाएद खानने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. या सिनेमातील त्याचा अभिनय अनेकांना आवडला पण नंतर तो बॉलिवूडमध्ये यश मिळवू शकला नाही आणि काही काळाने त्याने बॉलिवूडचा निरोप घेतला. नुकतंच त्याने झूम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याच्या विषयीच्या अनेक गोष्टींविषयी खुलासा केला.

Zayed Khan
Kangna Ranaut: कंगना रणौतची खासदारकी अडचणीत; कोर्टात ती गोष्ट सिद्ध झाल्यास जाऊ शकते खुर्ची; काय आहे प्रकरण?

झाएद हा सुप्रसिद्ध अभिनेते आणि निर्माते संजय खान यांचा मुलगा आहे. संजय खान आणि त्याकाळच्या सुप्रसिद्ध अभिनेत्री झीनत अमान यांच्या बरोबर अफेअर होतं. हे प्रकरण खूप गाजलं होतं. यावर झाएदने पहिल्यांदाच भाष्य केलं.

Zayed Khan
Marathi Actress Engagement : नवरा माझा नवसाचा 2 मधील अभिनेत्रीने गुपचूप उरकला साखरपुडा, होणारा नवरा करतो 'या' क्षेत्रात काम

झाएदला त्याच्या वडिलांचं झीनत यांच्याशी असलेलं अफेअर आणि त्याचा घरच्यांवर, त्याच्यावर झालेला परिणाम असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. तो म्हणाला कि,"हे फक्त माझ्या वडिलांच्याच नाही तर प्रत्येकाच्या घरी घडत होतं. यात काहीजण वेगळे होते जे खरोखरच खूप प्रामाणिक होते आणि ते या सगळ्यात नसायचे. पण इतर सगळे अगदीच सारखे होते. त्यावेळी लोक सतत पार्टी करायचे. जॅझी कपडे घालायचे. त्यावेळेची व्यक्तिमत्वं खरंच वेगळी होती."

झीनत आणि संजय खान यांचं अफेअर बराच काळ होतं. ४० वर्षांपूर्वी झीनत यांच्या डोळ्याला दुखापत झाली होती आणि त्यांची डोळ्याची दृष्टी काहीशी गेली आणि त्यामुळे झीनतही सिनेविश्वपासून दुरावल्या. एका मुलाखतीत त्यांनी त्यांच्या बॉयफ्रेंडशी झालेल्या भांडणात त्यांना ही दुखापत झाली होती. जरी त्यांनी संजय यांचं या मुलाखतीत नाव घेतलं नसलं तरीहीअनेकजण हे संजय खान यांनीच केलं असल्याचं मानतात.

Zayed Khan
Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीत वर्णभेद ? , सूरज चव्हाणवर होणाऱ्या भेदभावावर चला हवा येऊ द्या फेम अभिनेता भडकला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com