Vicky Kaushal Jacket Video: विकीने दिली छत्रपती शिवरायांना मानवंदना, अनोख्या जॅकेटनं वेधलं सर्वांचं लक्ष
Chhaava Music Launch Program: विकी कौशल मुख्य भूमिकेत असलेला छावा चित्रपट 14 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी या चित्रपटाचा म्युझिक लॉन्च सोहळा पार पडला. त्यावेळी विकी कौशलच्या जॅकेटने सर्वांचं लक्ष वेढलं.
विकी कौशलचा 'छावा' चित्रपट उद्या म्हणजेच 14 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट रिलीज होण्याआधी चित्रपटाचं मोठ्या प्रमाणात अॅडव्हान्स बुकिंग झालं आहे. दरम्यान काल (12 फेब्रुवारी) म्युझिक लॉन्च सोहळ पार पडला.