VIN DOGHANTALI HI TUTENA ESAKAL
Premier
अरे हा काय टाइमपास लावलाय... तेजश्री- सुबोधच्या नव्या मालिकेवर प्रेक्षक नाराज; म्हणतात- एकही भाग पॉझिटिव्ह...
VIN DOGHANTALI HI TUTENA AUDIENCE REACTION : 'वीण दोघातली ही तुटेना' ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली. मात्र मालिकेचे पहिले काही भाग पाहून प्रेक्षक नाराजी व्यक्त करत आहेत.
छोट्या पडद्यावर गेल्या काही महिन्यात काही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. त्यात स्टार प्रवाह आणि झी मराठी या दोन वाहिन्यांचा समावेश आहे. झी मराठीवर नव्याने सुरू झालेली मालिका 'वीण दोघातली ही तुटेना' मध्ये अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता सुबोध भावे यांची मुख्य भूमिका आहे. तेजश्रीच्या पुन्हा छोट्या पडद्यावर येण्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. मात्र आता तिच्या नव्या मालिकेवर प्रेक्षक नाराज असल्याचं दिसतंय. त्याचं कारण म्हणजे मालिकेचं कथानक. मालिका सुरू झाल्यापासून मालिकेचं कथानक पुढे जातंच नाहीये असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे. त्यामुळे प्रेक्षक वैतागले आहेत.