
बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान सध्या ६० वर्षांचा आहे. आधीच्या दोन पत्नींसोबत घटस्फोट घेतल्यानंतर तो आता त्याच्या तिसऱ्या गर्लफ्रेंडला गौरी स्प्रेटला डेट करत आहे. त्याच्या वाढदिवशी, त्याने सर्वांना त्याच्या नव्या मैत्रिणीची ओळख करून दिली. त्यानंतर सगळीकडे एकाच चर्चा रंगली. तीन मुलांचा बाप असलेला आमिर आता तिसऱ्यांदा प्रेमात पडलाय. चित्रपट निर्माते विक्रम भट्ट यांनीही अभिनेत्याच्या या नात्यावर आपलं मत मांडलं आहे.