अभिनेता विक्रांत मॅसी याचा मोठा चाहतावर्ग आहे. '12thफेल' चित्रपटानंतर तर त्याची क्रेझ प्रचंड वाढली. दरम्यान अशातच आता मॅसीचा नवा चित्रपट 'आँखो की गुस्ताखियाँ' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या टीझरमधील मॅसीचा किसिंग सीन पुन्हा चर्चेत आलाय. विक्रांत मॅसीनं त्याच्यापेक्षा 13 वर्ष लहान असलेल्या स्टार किडसोबत किसिंग सीन दिलाय.