

Sagar di Vohti: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, हे सांगता येत नाही. वेगवेगळ्या गाण्यांवरील रिल्स नेटकरी आवडीनं बघतात. गुलाबी साडी, गुलाबी शरारा, बादल बरसा बिजुली यांसारखी गाणी सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. अशातच सध्या 19 वर्षांपूर्वीचं एक गाणं देखील सोशल मीडियावर ट्रेंड होतं आहे. इन्स्टाग्रामवर रिल्स बघताना अनेकांना "सागर दी वोटी लेती इंडिका चला..." (Sagar di Vohti lendi Indica chala) हे गाणं ऐकू येत असेल. 19 वर्षापूर्वीच्या या गाण्याची सोशल मीडियावर कमालीची क्रेझ बघायला मिळत आहे. या गाण्याचा नेमका अर्थ काय? हे गाणं कोणी गायलं आहे? असे प्रश्न सध्या अनेकांना पडत असतील जाणून घेऊयात या भन्नाट गाण्यामागची गोष्ट....
"सागर दी वोटी लेती इंडिका चला" हे गाणं 2005 मध्ये रिलीज करण्यात आलं होतं. हे गाणं अमृतसरच्या एका गावात राहणाऱ्या सतनाम सागर आणि त्याची पत्नी शरणजीत शम्मी या जोडप्यानं गायलं आहे. सध्या सतनाम सागर आणि शरणजीत शम्मी हे 'सागर दी वोटी' या त्यांच्या गाण्यामुळे लोकप्रिय झाले आहेत.
एका मुलाखतीत सतनाम सागर यांनी गाण्याला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल सांगितलं. ते म्हणाले, "जेव्हा हे गाणं रिलीज झालं होतं तेव्हा गाण्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता, पण आजच्या सोशल मीडियाच्या जगात ते इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे."
"अनेक दशकांपूर्वी, माझे मित्र गाणी लिहिण्यासाठी आणि संगीतबद्ध करण्यासाठी माझी थट्टा करत होते, परंतु तरीही माझ्या अल्बम्सला प्रेक्षकांची पसंती मिळत होती. ‘फुलन वाली राजाई’ आणि ‘छिंदो दी हत्ती’ हे माझे अल्बम विशेष लोकप्रिय झाले.", असंही सतनाम सागर यांनी सांगितलं.
"सागर दी वोटी लेती इंडिका चला, इमीजेटली है कोई मेरी मजबूरी, मैनूं छेती दे ड्राइवरी सिखा…", असे या गाण्याचे लिरिक्स आहेत. याचा अर्थ- "सागरची बायको इंडिका चालवू शकते, मला आता अर्जन्सी आहे, म्हणून मला ताबडतोब गाडी कशी चालवायची, ते शिकव"
आतापर्यंत या गाण्यावर 1.5 मिलियन रिल्स तयार करण्यात आले आहेत.
विविध सेलिब्रिटींमध्ये "सागर दी वोटी" या गाण्याची क्रेझ बघायला मिळत आहे. कॉमेडियन भारती सिंग, पंजाबी गायक निम्रत खैरा आणि मनकीरत औलख यांसारख्या सेलिब्रिटींनी या गाण्यावर रिल्स तयार केले आहेत.
भारती सिंगनं तिचा पती हर्ष लिम्बाचियासोबत "सागर दी वोटी" या गाण्यावर रिल तयार केलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.