Virat Kohli and Anushka viral video
esakal
Virat Kohli Ignore Handicap Fan Viral Video : विराट अनुष्का नुकतेच प्रेमानंदजी महाराज यांच्या दर्शनाला गेले होते. त्यांची ही प्रेमानंद महाराजांना भेटण्याची तिसरी वेळ होती. परंतु त्यांना भेटून येताना दोघे वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहे. विचित्र वागण्यामुळे त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. जेव्हा ते प्रेमानंद महाराजांना भेटून मुंबई विमातळावर पोहचले, तेव्हा त्यांचं एका चाहत्यांसोबतच वागणं पाहून नेटकऱ्यांनी त्यांना चांगलंच ट्रोल केलय.