VIDEO: अन् अनुष्कानं थेट हात जोडले; आरसीबी मॅच जिंकताच विरुष्काचं हटके सेलिब्रेशन, पाहा व्हिडीओ

Virat kohli And Anushka sharma: व्हिडीओमध्ये विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा ही आरसीबी टीम जिंकल्यानंतर हटके सेलिब्रेशन करताना दिसत आहे.
Virat kohli And Anushka sharma
Virat kohli And Anushka sharmasakal

Virat kohli And Anushka sharma: यंदाचा आयपीएल (IPL 2024) सीझन क्रिकेटप्रेमींसाठी खास ठरत आहे. विविध टीम्समध्ये होणारे अटीतटीचे सामने क्रिकेटप्रेमी आवडीनं बघत आहेत. अशातच काल (12 मे) रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यात मॅच झाली. या मॅचमध्ये आरसीबीचा दणदणीत विजय झाला. अशातच या मॅचदरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये विराट कोहलीची (Virat Kohli) पत्नी अनुष्का शर्मा (Anushka sharma) ही आरसीबी मॅच जिंकल्यानंतर हटके सेलिब्रेशन करताना दिसत आहे.

अन् अनुष्कानं थेट हात जोडले

काल (12 मे) एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या IPL 2024 च्या सामन्यात RCB ने दिल्ली कॅपिटल्सचा 47 धावांनी पराभव केला.या सामन्यादरम्यान विराटची पत्नी अनुष्का ही आरसीबी टीमला सपोर्ट करताना दिसली. नुकताच अनुष्काचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये दिसत आहे की, आरसीबीच्या लॉकी फर्ग्युसनने मुकेश कुमारची विकेट घेऊन सामना जिंकला. दिल्ली कॅपिटल्सची शेवटची विकेट पडताच अनुष्का उभी राहिला आणि तिने थेट हात जोडले. त्यानंतर विराटही अनुष्काकडे पाहून मॅच जिंकल्याचा आनंद व्यक्त करताना दिसला.

अनुष्का आणि विराटच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

पाहा व्हिडीओ

Virat kohli And Anushka sharma
IPL Playoff Scenarios : RCBच्या विजयाने बदलले समीकरण, 3 संघ बाहेर, पण 6 अजूनही प्लेऑफच्या शर्यतीत...

अनुष्का आणि विराट हे फेब्रुवारी महिन्यात दुसऱ्यांदा आई-बाबा झाले आहेत. विरुष्कानं ही आनंदाची बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं, "आम्हाला सांगायला आनंद होत आहे की, 15 फेब्रुवारी रोजी 'अकाय'चं म्हणजेच विमिकाच्या छोट्या भावाचं आम्ही या जगात स्वागत केलं."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com