
Marathi News : भारतीय सिनेविश्वातील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं 19 जूनला संध्याकाळी निधन झालं. त्यांच्या निधनाच्या बातमीने मराठी सिनेविश्वावर शोककळा पसरली. रंगभूमी, मालिका आणि सिनेमा अशा तिन्ही माध्यमांमध्ये विवेक यांनी त्यांच्या अभिनयाची छाप पाडली होती. शिस्तप्रिय नट म्हणून त्यांचा लौकिक होता. त्यांच्या निधनानंतर अनेक चाहत्यांनी आणि कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हळहळ व्यक्त केली.