Shweta Shinde: विवेक ओबेरॉय कॉलेजमध्ये सिनियर तर करिना, शाहिदशी ओळख, मराठी निर्माती श्वेता शिंदेचं बॉलिवूड कनेक्शन

Shweta Shinde: नुकत्याच महा एमटीबी या युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये श्वेता शिंदेने तिच्या काही बालपणीच्या आणि कॉलेजच्या आठवणी शेअर केल्या.
Shweta Shinde
Shweta Shindeesakal

Shweta Shinde: मराठी इंडस्ट्रीमधील एक नावाजलेली अभिनेत्री ते आता उत्तम निर्माती म्हणून म्हणून श्वेता शिंदेने (Shweta Shinde) स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केलीये. अवंतिका, वादळवाट यांसारख्या मालिकांमध्ये तिने अभिनेत्री म्हणून काम केलं होतं तर तिने 'लागीर झालं जी', 'अप्पी आमची कलेक्टर', 'मिसेस मुख्यमंत्री' यांसारख्या अनेक मालिकांची निर्मिती सुद्धा केली आहे. नुकत्याच महा एमटीबी या युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने तिच्या काही बालपणीच्या आणि कॉलेजच्या आठवणी शेअर केल्या.

ती म्हणाली,"माझा जन्म साताऱ्याचा आहे आणि तिथेच माझं शिक्षण झालं. माझे आई-वडील तिथेच असतात. आमचं कल्पतरू नावाचं टुमदार घर आहे आणि माझी त्या घराशी खूप अटॅचमेंट आहे. माझं पहिली ते दहावी शिक्षण साताऱ्यात झालं. दहावी झाल्यानंतर मी असा विचार केला कि आपण मुंबई किंवा पुण्याला जाऊन शिक्षण घेऊया. मी मुंबईला जायचं ठरवलं. माझ्या वडिलांचा या गोष्टीला विरोध होता पण माझ्या आईची मी मुंबईत शिक्षण घ्यावं अशी इच्छा होती. शेवटी मी मिठीबाई कॉलेजला प्रवेश घेतला. तिकडंच सगळं ग्लॅमरस वातावरण खरंतर माझ्यासाठी थोडंसं धक्कादायक होतं कारण अशा वातावरणात मी कधी वाढले नव्हते. ते पूर्णपणे एक वेगळं विश्व होतं. सुरुवातीला मला थोडा त्रास झाला पण मी साताऱ्यात कॉन्व्हेंटमध्ये शिकलेली असल्याने एवढाही त्रास झाला नाही.

या आठवणी सांगतानाच तिने तिच्या बॉलिवूड कलाकारांशी असलेल्या कनेक्शनबद्दलही सांगितलं. ती म्हणाली,"मी कॉलेजमध्ये असताना करिना कपूर, शाहिद कपूर आणि इशिता भट्ट यांना पाहिलं होतं. अजय देवगण, करिष्मा कपूर हे सगळे सिनियर बॅचचे होते त्यामुळे त्यांना कधी पाहिलं नाहीये पण विवेक ओबेरॉय मला दोन-तीन वर्षं सिनियर होता. या सगळ्यांशी माझं बोलणं झालं होतं. त्यावेळी हे सगळे कॉलेजच्या कल्चरल कार्यक्रमात खूप काम करायचे. नाटक, फॅशन शो यामध्ये सगळेचजण खूप अॅक्टिव्ह असायचे."

इंडस्ट्रीत तिची एंट्री कशी झाली याबद्दल सांगताना ती म्हणाली,"कॉलेजमध्ये असताना मी फॅशन शो केला होता. ते बघून माझं मालिकेसाठी सिलेक्शन झालं. जेव्हा घरी सांगितलं तेव्हा अर्थात घरून विरोध झाला पण शेवटी बाबांनी परवानगी दिली आणि इथूनच अभिनयक्षेत्रात काम करायला माझी सुरुवात झाली."

Shweta Shinde
Shweta Shinde: श्वेता शिंदेची भावूक पोस्ट

सुरुवातीच्या काळात हिंदी- मराठी मालिकांमध्ये काम करत श्वेताने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. प्रेग्नेंसीनंतर तिने मालिका निर्माती स्वतःचा एक प्रवास सुरु केला. आता ती मराठी इंडस्ट्रीतील आघाडीची निर्माती म्हणून ओळखली जाते."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com