VIVEK OBEROI
esakal
VIVEK OBEROI REVEALS UNDERWORLD THREATS: बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय याने २००० च्या दशकामध्ये अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलय. परंतु २००३ मधील एका पत्रकार परिषदेनंतर त्यांच्या करिअरला एक वेगळं वळण मिळालं. एका पॉडकास्टमध्ये त्याने त्याच्या कठीण काळाबद्दल सांगितलं आहे. या काळात त्याला खूप मानसिक त्रास सहन करावा लागला असल्याचं त्याने म्हटलय. तसंच त्याच्यासोबत काम करणाऱ्या निर्माते-दिग्दर्शकांना सुद्धा अंडरवर्ल्डमधून धमक्या येत असल्याचं त्याने सांगितलं.