SAMNE MARATHI PLAY CONTROVERSY
esakal
VANDANA GUPTE STATEMENT ON MARATHI THEATRE AAMNE SAMN ARTIST REMUNERATION: 'आमने सामने' नाटकाच्या टीममध्ये गेल्या काही दिवसापासून वाद सुरु आहे. रोहन गुजर आणि केतकी पालव यांना अचानक नाटकातून रिप्लेस केल्याचं सांगितलं होतं. परंतु त्यानंतर लीना भागवत आणि मंगेश कदम यांनीही एक व्हिडिओ शेअर करत नाण्याच्या दोन बाजू असल्याचं म्हणत त्यांची बाजू मांडली. रोहन आणि केतकी यांनी मानधन वाढ मागितली म्हणून काढल्याचा आरोप केला, तर लीना आणि मंगेश यांनी सततच्या मानधन वाढीमुळे त्यांना काढल्याचं म्हटलंय. सध्या हे प्रकरण चर्चेत आहे. दरम्यान आता ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी भाष्य करत कलाकरांचे कान टोचलेत.