ANIL KAPOOR AND NANA PATEKAR
esakal
BOLLYWOOD NEWS: वेलकममधील उदय शेट्टी आणि मजनू भाई या भन्नाट जोडीने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले होते. आता हीच जोडी एका वेगळ्या सिनेमातून पुन्हा एकदा एकत्र येणार आहे. अभिनेता अनिल कपूर आणि नाना पाटेकर आगामी 'झॉम्बी' कॉमेडीसाठी निर्मात फिरोजनाडियाडवाला यांच्या संपर्कात आहेत. अहमद खान या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून, यात टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत असल्याचे सांगितले जात आहे.