

hema malini
esakal
बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात होते. त्यांना श्वास घ्यायला त्रास होत असल्याने इस्पितळात दाखल करण्यात आलेलं. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलेलं. तर १० नोव्हेंबर रोजी त्यांच्या मृत्यूची अफवा देखील पसरली होती. आता १२ नोव्हेंबर रोजी त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. मात्र घरी त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहेत. धर्मेंद्र यांचं वैयक्तिक आयुष्य कायम चर्चेचा विषय राहिलंय. त्यांच्या दोन्ही पत्नी आणि त्यांची मुलं कायम चर्चेत राहिली. आता हेमा मालिनी यांची एक मुलाखत सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतेय. ज्यात त्यांनी त्यांच्या सावत्र मुलांबद्दल सांगितलंय.