

'आई कुठे काय करते' या मालिकेने तब्बल ५ वर्षांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्याजागी नव्याने सुरू झालेली 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेत अभिनेत्री निवेदिता सराफ आणि मंगेश कदम मुख्य भूमिकेत आहेत. ही मालिका दुपारी २. ३० वाजता प्रक्षेपित करण्यात येतेय. २ डिसेंबरपासून ही मालिका प्रसारित करण्यात आलीये. आता ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे का हे पाहूया.