हृषीकेश गुप्त दिग्दर्शित 'जारण' या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झालं आहे. पोस्टर बघून प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न पडलेत. भयपटाचं हे पोस्टर पाहून अभिनेत्री अमृता सुभाष महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार असल्याचं बोललं जातय. 'जारण' हा मानवी भावना आणि दुहेरी आयुष्याचा शोध घेणारा प्रवास असून यात अनेक रहस्ये लपली आहेत, जी प्रेक्षकांना अनुभव येणार आहेत.