
Marathi Entertainment News : बॉलिवूडमध्ये अभिनेत्यांबरोबर काही दिग्गज अभिनेत्रीही होऊन गेल्या ज्यांच्या सौंदर्याने अगदी त्याकाळचे सुपरस्टारही घायाळ झाले होते. मधुबाला यांच्या आगमनापूर्वी बॉलिवूडमध्ये ज्याच्या सौंदर्याच्या चर्चा होत्या त्या अभिनेत्री होत्या सुरैय्या. सुरैय्या या एकेकाळी बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्री होत्या आणि त्यावेळेच्या अनेक अभिनेत्याच्या क्रशही होत्या. पण एका सुपरस्टार अभिनेत्याने त्यांच्याबरोबर गैरवर्तन केलं होतं.