
Bollywood News : गायक उदित नारायण यांच्या लीप किसिंग व्हिडिओचा वाद सगळीकडे पेटला असतानाच त्यांच्याबद्दलची एक जुनी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होतेय. या पोस्टमध्ये उदित नारायण, कुमार सानू यांच्यावरvचुकीच्या वागणुकीवरून आरोप करण्यात आले आहेत. उदित नारायण हे सूत्रसंचालिकेशी बायकोसमोरच फ्लर्ट करत होते तर अलका याज्ञीक यांना गाताना कुमार सानू यांनी दोन-तीनदा चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचं या पोस्टमध्ये म्हटलं.