Who Was Jaswant Singh Khalra?
esakal
अभिनेता दिलजीत दोसांझचा 'सतलुज' चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. हा चित्रपट काही दिवसांपूर्वी ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर तो प्लॅटफॉर्मवरून हटवण्यात आला आहे. त्यामुळे या चित्रपटाभोवती नवा वाद निर्माण झाला आहे. हा चित्रपट पंजाबमधील मानवाधिकार कार्यकर्ते जसवंत सिंह खालरा यांच्या आयुष्यावर आणि १९८०-९० च्या दशकात बेपत्ता झालेल्या पंजाबमधील नागरिकांच्या प्रकरणांवर आधारित असल्याचे सांगितले जाते.