

why mrunal dusanis return to india
esakal
छोट्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक असणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मृणाल कुलकर्णी. 'सुखाच्या सरींनी हे मन बावरे', 'माझिया प्रियाला प्रीत कळेना' यांसारख्या मालिका केल्यानंतर मृणाल लग्न होऊन परदेशी सेटल झाली होती. तिथेच तिच्या मुलीचाही जन्म झाला. मात्र ४ वर्षानंतर तिने परदेशातील लॅव्हिश लाइफस्टाइल सोडून पुन्हा मायदेशी येण्याचा निर्णय घेतला. सध्या ती 'लग्नानंतर होईलच प्रेम' या मालिकेत दिसतेय. तिच्या या भूमिकेला देखील प्रेक्षकांचं प्रेम मिळतंय. मात्र मालिका हे तिच्या भारतात परतण्याचं कारण नव्हतं. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने त्यामागचं कारण सांगितलंय.