

renuka shahane on laxmikant berde
ESAKAL
मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री रेणुका शहाणे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. रेणुका आणि दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे लवकरच 'उत्तर' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशातच नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत रेणुका यांनी लक्ष्मीकांत यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव सांगितला होता. 'हाच सुनबाईचा भाऊ' या चित्रपटात रेणुका यांनी लक्ष्मीकांत त्यांच्यासोबत काम केलेलं. यादरम्यान नृत्यदिग्दर्शकाचा ओरडा मिळाल्यावर त्यांनीच रेणुका शहाणेंना धीर दिला होता. इतकंच नाही तर लक्ष्मीकांत यांनी त्यांच्या मुलाचं नाव अभिनय का ठेवलं याबद्दलही रेणुका यांना सांगितलं होतं.