

Madhuri Dixit reveals reason for hosting Kon Honar Crorepati
esakal
भारतीय सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असलेली माधुरी दीक्षित गेले काही दिवस सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याचं कारण म्हणजे ती सोनी टीव्हीवरील 'कोण होणार करोडपती' च्या सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे. जेव्हा माधुरी हॉटसीटवर स्पर्धक म्हणून नव्हे, तर सूत्रसंचालक म्हणून विराजमान होते, तेव्हा उत्सुकता निर्माण होणं साहजिकच आहे. मात्र अनेकांना माधुरी आता अचानक मराठीत ते ही छोट्या पडद्यावर परत कशी आली याबद्दल कुतूहल वाटत होतं. तिने होस्टिंग करायला होकार का दिला याबद्दल खुद्द माधुरीनेच उत्तर दिलंय.