

neetu kapoor
esakal
Bollywood News: आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ पाडणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री नीतू कपूर एकेकाळी बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्री होत्या. मात्र ऋषी कपूर यांच्याशी लग्न झाल्यानंतर त्यांनी गृहिणी होणं पसंत केलं. एक बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या नीतू यांनी पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये काम करणं सुरू केलं ते देखील ऋषी कपूर यांच्या निधनानंतर. एकदा नीतू कपूर ऋषी यांच्या ऐवजी चक्क स्वतःच्या सासऱ्यांनाच ओरडल्या होत्या. नीतू यांच्या नणंद रितू नंदा यांनी त्यांच्या पुस्तकात याबद्दल सांगितलं होतं.