
आपल्या बालपणीची भन्नाट सिरियल म्हणजे शक्तिमान
पण ही सिरियल अचानक बंद झाली
यामागे नेमके काय कारण होते, जाणून घेऊया
Shaktiman Hindi Serial : भारताचा पहिला सुपरहिरो ‘शक्तिमान’ हा 90च्या दशकातील सर्वात लोकप्रिय टेलिव्हिजन मालिका होता. 1997 मध्ये दूरदर्शनवर सुरू झालेल्या या मालिकेने लाखो मुलांच्या मनावर अधिराज्य गाजवले. मुकेश खन्ना यांनी साकारलेला शक्तिमान आणि त्याचा मूळ अवतार पंडित गंगाधर विद्याधर मायाधर ओमकारनाथ शास्त्री यांनी प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले. पण 2005 मध्ये ही मालिका अचानक बंद झाली आणि चाहत्यांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले. आता 20 वर्षांनंतर या बंदमागील धक्कादायक कारण समोर आले आहे.