दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन याचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. त्याने त्याच्या अभिनयाच्या जोरावर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. 'पुष्पा' चित्रपटाच्या यशानंतर अल्लू अर्जुनचा एक वेगळा चाहतवर्ग निर्माण झालाय. त्याची स्टाईल, त्याची भाषा याची चाहत्यांना भुरळ पडलीय. दरम्यान आता अल्लू अर्जुन नाव बदलणार असल्याची चर्चा रंगत आहे.