
"'सन मराठी' वरील सर्वच मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. 'सन मराठी' वाहिनी प्रत्येक मालिकेतून महिलांनी सक्षम व खंबीर उभं राहील पाहिजे हा सल्ला देत आहे. याचसह कोणत्याही स्त्रीला कधी संघर्ष चुकत नाही. सामान्य स्त्री असो किंवा अभिनेत्री प्रत्येक स्त्री संघर्ष करत पुढे जात असते. 'सन मराठी'वरील अभिनेत्रींनी समस्त स्त्री वर्गाला महिला दिनाच्या शुभेच्छा देत असताना त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा क्षण सांगितला आहे.