Yeu Kashi Tashi Mi Nandayla : 'येऊ कशी तशी फेम' अभिनेत्याला पुत्ररत्न; अभिनंदनाचा होतोय वर्षाव

झी मराठीवरील येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या कलाकाराच्या घरी बाळाचं आगमन झालं. सोशल मीडियावर त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय.
Yeu Kashi Tashi Mi Nandayla
Yeu Kashi Tashi Mi NandaylaEsakal

झी मराठीवर काही वर्षांपूर्वी गाजलेली एक लोकप्रिय मालिका म्हणजे 'येऊ कशी तशी मी नांदायला' (Yeu Kashi Tashi Mi Nandayala). संपूर्ण वर्षं प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या या मालिकेतील प्रत्येक भूमिका लोकप्रिय ठरली. या मालिकेत मोहित परबची निगेटिव्ह भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात घर करणारा अभिनेता निखिल राऊत (Nikhil Raut) बाबा झाला आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करत निखिलने ही आनंदाची बातमी शेअर केली.

निखिलच्या पत्नीने दिला मुलाला जन्म

२७ मे २०२४ ला निखिलच्या पत्नीने गोंडस मुलाला जन्म दिला. बायको आणि लेकासोबतचा क्युट फोटो शेअर करत निखिलने ही बातमी शेअर केली. या फोटोमध्ये निखिलने बाळाचा चेहरा इमोजीने झाकला आहे.

"आमच्या लाडक्या मुलाचं आगमन झाल्याचं जाहीर करताना खूप आनंद होतो आहे. २७ मे २०२४ ला आमच्या बाळाचा जन्म झाला. त्याच्यावर तुमचे आशीर्वाद आणि प्रेम असु द्या.

तुमचे लाडके,

मयुरी आणि निखिल राऊत " अशी पोस्ट लिहीत निखिलने ही आनंदाची बातमी शेअर केली. तसेच हॉस्पिटलमधील डॉक्टर्सचे आणि सपोर्ट स्टाफचे आभार मानले.

सांताक्रूझमधील सूर्या हॉस्पिटलमध्ये निखिलच्या बायकोने मुलाला जन्म दिला. निखिलच्या बाळाचे फोटो पाहण्यास चाहते उत्सुक आहेत.

निखिलने ही पोस्ट शेअर करताच त्याच्या सेलिब्रिटी मित्रांनी आणि चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. सुकन्या मोने, राधा सागर, सारिका नवाथे, निलेश साबळे, अदिती द्रविड, धनश्री काडगावकर, अद्वैत दादरकर, विवेक सांगळे आणि अशा अनेक कलाकारांनी निखिलचं अभिनंदनं केलं.

Yeu Kashi Tashi Mi Nandayla
Raveena Tandon : 'रवीनाने मारहाण केली नाही' पोलिसांचा खुलासा, तक्रार करणाऱ्या कुटूंबाची केली पोलखोल

निखिलची कारकीर्द

निखिलने आजवर अनेक मालिका, सिनेमा आणि नाटकांमध्ये काम करत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. 'चॅलेंज' या नाटकात त्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका साकारली होती. तर फत्तेशिकस्त, फर्जंद या सिनेमातील त्याची भूमिका सगळ्यांच्या विशेष लक्षात राहिली.

येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत त्याने साकारलेला मोहित सगळ्यांना आवडला. स्वीटू आणि ओमला मालविकाच्या सांगण्यावरून त्रास देणारा, पैसे मिळावेत म्हणून कोणत्याही थराला जाणाऱ्या निखिलचं काम सगळ्यांना आवडलं.

Yeu Kashi Tashi Mi Nandayla
Anvita Phaltankar: गेल्या चार महिन्यांपासून... ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या मराठी अभिनेत्रीला मनस्ताप, काय घडलं नेमकं?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com