Yogita Chavan: "सहा महिन्यांपूर्वी आई कायमची सोडून गेली"; लग्नाच्या व्हिडीओत योगिताला अश्रू अनावर

Yogita Chavan: योगिता आणि सौरभने शेअर केलेल्या वेडिंग व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
Yogita Chavan
Yogita Chavanesakal

Yogita Chavan: कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला (Jeev Majha Guntala) या मालिकेतून घराघरात पोहोचलेली जोडी अंतरा आणि मल्हार म्हणजेच योगिता चव्हाण (Yogita Chavan) आणि सौरभ चौघुले (Saorabh Choughule) काही दिवसांपूर्वीच लग्नबंधनात अडकले. त्यांच्या सरप्राईज वेडींगने अनेकांना धक्का बसला. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटोज चांगलेच गाजले होते. त्यातच आता योगिता आणि सौरभने शेअर केलेल्या वेडिंग व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

त्यांच्या लग्नाला काल म्हणजे ३ एप्रिल २०२४ ला एक महिना पूर्ण झाला. याच निमित्त साधून त्यांनी त्यांच्या वेडिंग टीझर सोशल मीडियावर शेअर केला. यावेळी आपल्या आईच्या आठवणी शेअर करताना योगिता भावूक झाल्याचं व्हिडिओमध्ये पाहायला मिळालं. "सौरभ माझ्या आयुष्यात आला त्याच्या सहा महिने अगोदर माझी आई मला सोडून गेली. मी नेहमी असं सांगते कि, आईनेच सौरभला पाठवलं आहे. माझी काळजी घेण्यासाठी तो माझ्या आयुष्यात आहे." हे सांगताना योगिताला अश्रू अनावर झाले तर सौरभने तिला जवळ घेत "मी नेहमीच तुझ्याबरोबर असेन" असं म्हणत धीर देण्याचा प्रयत्न केला.

या सोबतच या व्हिडिओमध्ये त्यांच्या संपूर्ण लग्नसोहळ्याची छोटीशी झलक पाहायला मिळाली. मेहंदी, संगीत, लग्न या तिन्ही कार्यक्रमात सौरभ आणि योगिताच्या कुटूंबाने केलेली धमाल, त्यांचे भन्नाट डान्स, त्यांनी खेळलेले खेळ यांची छोटीशी झलक यावेळी पाहायला मिळाली. तसंच लग्नावेळी सौरभच्या आईला अश्रू अनावर झाले तेव्हा योगिताने त्यांना जवळ घेत त्यांना धीर दिल्याची झलक या व्हिडिओमध्ये पाहायला मिळाली. तर योगिता आणि सौरभने मालिकेचं टायटल ट्रॅक गायल्याची झलकही या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतेय.

पाहा व्हिडीओ:

जीव माझा गुंतला या २०२१ साली कलर्स मराठीवर सुरु झालेल्या मालिकेत योगिता आणि सौरभने एकत्र काम केलं होतं. मालिकेच्या सेटवर त्यांची मैत्री झाली आणि पुढे या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं. त्यांनी त्यांचं रिलेशनशिप सिक्रेट ठेवलं होतं त्यामुळे त्यांनी त्यांच्या लग्नाचे फोटोज शेअर करताच चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com