Yogita Chavan’s ‘Tenu Kala Chashma’ Dance Goes Viral
esakal
अभिनेत्री योगिता चव्हाण हिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिने तिच्या अभिनयातून लाखोचा चाहतावर्ग निर्माण केलाय. कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला या मालिकेतून ती घराघरात पोहचली. तिने साकारलेली अंतराची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड भावली. प्रेक्षकांनी तिच्या पात्राला भरभरुन प्रेम दिलं. या मालिकेनंतर तिने बिग बॉसच्या घात एन्ट्री घेतली. परंतु ती तिथे जास्त दिवस खेळू शकली नाही. ती स्वत:हून बिग बॉसच्या घरातून बाहेर आली.