Elvish Yadav : रेव्ह पार्टीनंतर एल्वीश पुन्हा अडचणीत ; मनी लॉन्ड्रींग प्रकरणात ईडीकडून गुन्हा दाखल

Elvish Yadav trapped in money laundering case : बिग बॉस ओटीटी विजेता एल्वीश यादवला रेव्ह पार्टी प्रकरणात अटक झाल्यानंतर त्याच्यावर मनी लॉन्ड्रींग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लवकरच त्याची या प्रकरणात चौकशी होणार आहे.
Elvish Yadav trapped in money laundering case
Elvish Yadav trapped in money laundering case

Elvish Yadav : युट्युबर आणि बिग बॉस विजेता एल्वीश यादव काही ना काही काळामुळे चर्चेत असतो. कोब्रा स्कॅमनंतर आता मनी लॉन्ड्रींग केसमध्येही एल्वीश अडकल्याचं समोर आलं आहे.

ईडीची लखनऊमधील शाखा लवकरच या प्रकरणी एल्वीशची चौकशी करणार आहे. २ नोव्हेंबरला नोएडामध्ये दाखल करणाऱ्या तक्रारीचा आधार घेऊन त्याच्यावर मनी लॉन्ड्रींगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Elvish Yadav trapped in money laundering case
Elvish Yadav Bail: एल्विश यादवला जामीन मिळाला पण तुरुंगातून बाहेर येऊ शकला नाही, काय आहे कारण?

एल्वीश अडकला पुन्हा नव्या वादात

एल्वीश यादव सध्या सतत काही ना काही वादात अडकतोय. रेव्ह पार्ट्यांमध्ये सापाचं विष पुरवल्याप्रकरणी एल्वीश वादात अडकला होता. त्याचं हे प्रकरण ताजं असतानाच त्याच्यावर ईडीने मनी लॉन्ड्रींग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसंच त्याच्याकडे असलेल्या महागड्या गाड्यांचं असलेल्या कलेक्शनबाबतही ईडी त्याची चौकशी करणार असल्याचं म्हंटलं जातंय.

१७ मार्चला एल्वीशला कोब्रा स्कॅम प्रकरणात अटक झाली होती आणि त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. सध्या तो जामिनावर बाहेर असतानाच ईडी पुन्हा एकदा त्याला अटक करण्याची तयारी करत असल्याचं समजतंय. याबाबत एल्वीश किंवा त्याच्या कुटूंबीयांकडून कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली नाहीये.

जेलमधून सुटका झाल्यावर एल्वीशने तो निर्दोष असल्याचं म्हंटलं होतं, त्याला मिळालेलं यश लोकांना बघवत नाहीये म्हणून त्याला काहीही कारणाशिवाय अडकवत जात असल्याचं त्याने म्हंटलं होतं.

कोब्रा स्कॅम आणि एल्वीशला अटक

नोव्हेंबर २०२३ मध्ये दिल्ली पोलिसांनी एका रेव्ह पार्टीवर धाड टाकली. या पार्टीमध्ये २० मीली सापाचं विष हस्तगत करण्यात आलं. यावेळी एल्वीशचं नाव पहिल्यांदा समोर आलं. पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

पण त्याच्या पालकांनी पोलिसांनी केलेले आरोप नाकारले आणि त्याने कोणत्याही गुन्ह्याची कबुली दिली नसल्याचं म्हंटलं.

कसा झाला एल्वीश युट्युबचा सुपरस्टार?

एल्वीशने २०१६ साली आशिष चंचलानी आणि अमित भडाना यांच्यापासून प्रेरणा घेत स्वतःचं युट्युब चॅनेल सुरु केलं. अल्पवाढतीच तो युट्युबवर त्याला प्रसिद्धी मिळाली. त्याचे व्हिडीओज सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यातच त्याने बिग बॉस ओटीटी सीजन २ मध्ये सहभाग घेत त्या सीजनचं विजेतेपद पटकावलं. यानंतर तो सोशल मीडियाच्या जगातील सुपरस्टार झाला. त्यानंतर त्याने अनेक अभिनेत्रींबरोबर म्युझिक अल्बममध्येही काम केलं होतं.

Elvish Yadav trapped in money laundering case
Elvish Yadav: ना लग्झरी गाड्या ना कोट्यवधींची प्रॉपर्टी; एल्विश यादवच्या संपत्तीबद्दल काय म्हणाले आई-वडील?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com