

vin doghatli hi tutena new entry
ESAKAL
झी मराठीवरील 'वीण दोघातली ही तुटेना' ही मालिका प्रेक्षकांची आवडती आहे. या मालिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभतोय. सध्या मालिकेत समर आणि स्वानंदी यांच्या प्रेमाचा ट्रॅक दाखवला जातोय. ते दोघेही हळूहळू एकमेकांच्या प्रेमात पडतायत. समर आता स्वानंदीच्या भावनांचा जास्त विचार करू लागलाय. त्यामुळे त्याच्या छोट्या छोट्या प्रयत्नांवर स्वानंदीदेखील भाळलीये. मात्र मल्लिका त्यांच्या आयुष्यात विघान आणण्याची एकही संधी सोडत नाहीये. अशातच आता मालिकेत नवी एंट्री होणार आहे. मालिकेत समरच्या मैत्रिणीची एंट्री होणार आहे.