

Marathi Entertainment News : सध्या मराठी टीव्ही इंडस्ट्रीमध्ये रिमेकचा ट्रेंड सुरु झाला आहे. नुकताच स्टार प्रवाहने महादेव अँड सन्स मालिकेचा रिमेक मराठीत येणार असल्याचं प्रोमो शेअर करत जाहीर केलं. सुना येति घरा या नावाने ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. त्यातच आता झी मराठीनेही नव्या मालिकेची घोषणा केली.