

nikhil damle
ESAKAL
मुंबई ही स्वप्नांची नगरी आहे. इथली झगमगती दुनिया सगळ्यांनाच आकर्षित करते. देशातल्या कानाकोपऱ्यातून अनेक कलाकार आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी इथे येतात. महाराष्ट्रातील अनेक छोट्या मोठ्या गावातून, शहरांतून अनेक आर्टिस्ट आपलं नशीब आजमावण्यासाठी मुंबईची वाट धरतात. असाच एक कलाकार म्हणजे निखिल दामले. निखिल सध्या 'कमळी' मालिकेत ऋषीची भूमिका साकारतोय. त्याची आणि कमळीची जोडी प्रेक्षकांना आवडतेय. मात्र निखिलनेदेखील इथवर पोहोचण्यासाठी संघर्ष केलाय. तो अवघ्या विसाव्या वर्षी मुंबईत आलेला. आता एका मुलाखतीत त्याने त्याच्या मुंबईच्या पहिल्या प्रवासाचा किस्सा सांगितलाय.