Lakshmi Niwas Twist
esakal
Lakshmi Niwas Zee Marathi Serial: 'लक्ष्मी निवास' मालिकेत गेल्या काही दिवसापासून अनेक नवनवे ट्वीस्ट येताना पहायला मिळत आहेत. जयंतने आजीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला हे जान्हवीसमोर आलेलं असतं. तसंच वेंकीला विहिरीत ढकलणारा सुद्धा जयंतच असतो हे सुद्धा जान्हवीला कळालेल असतं. हे सत्य कळाल्यानंतर जान्हवीला खुप मोठा धक्का बसतो, आणि ती जयंतला धडा शिकवण्याचा निर्णय घेते. परंतु तिला आपल्या आईबाबांना त्रास देयचा नसतो.