Laxmi Nivas Serial Promo: Janhvi Reveals Pregnancy, Jayant’s Shocking Reaction Goes Viral
esakal
Laxmi Nivas Serial: झी मराठीवरील 'लक्ष्मी निवास' ही मालिका सध्या घराघरात पोहचली आहे. मालिकेतील पात्र हे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. ही मालिका नेहमी ट्रोल होत असली तरी प्रेक्षक आवडीने ही मालिका पाहतात. या मालिकेतील भावना आणि सिद्धूची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडते. तर जयंत जान्हवीला आता नवी काय शिक्षा देणार हे बघण्यासाठी प्रेक्षक मालिकेची आतुरतेने वाट बघतात.