

SANAI CHAUGHDE UPCOMING EPISODE
ESAKAL
Zee Marathi Sanai Choughade Serial: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'सनई चौघडे' ने काही महिन्यातच प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलंयने टीआरपी यादीतही टॉप १० मध्ये स्थान मिळवलंय. मालिकेतील जय आणि शरूची जोडी तर प्रेक्षकांची आवडती आहेच सोबतच मालिकेतील प्रत्येक ट्विस्ट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. गेल्या काही महिन्यात मालिकेत जय आणि शरू यांना जवळ आणणारं कथानक दाखवण्यात आलं. मात्र आत अखेर त्यांच्या प्रेमाची सुरुवात होणार आहे. नुकताच झी मराठीने एक प्रोमो शेअर केलाय जो पाहून चाहते त्यांच्या जोडीवर पुन्हा एकदा फिदा झालेत.